Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

मुंबई

मायभूमी डॉट कॉमने आपल्‍या वाचकांसाठी आयपीएल क्रिकेटचा टी-20 थरार अनुभवण्‍याची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. मायभूमीचा मोफत टुलबार डाऊनलोड करून घरी, ऑफीसात किंवा कुठेही सामन्‍यांचा लाईव्‍ह स्‍कोर या सोईद्वारे पाहता येणार आहे.

केवळ एकदा टुलबार डाऊनलोड करावा लागणार असून ही पध्‍दत अतिशय सोपी आहे. त्यासाठी ‘क्रिकेट स्‍कोर‘ या लिंकवर क्लिक करून समोर आलेल्‍या डाऊनलोड या ऑप्‍शनवर क्लिक करायची आहे. हा टुलबार डाऊनलोड झाल्‍यानंतर तुमच्‍या ब्राऊझरवर दिसेल. त्‍यातून क्रिकेट लाईव्‍ह स्कोअरकार्ड व बॅटींग आणि बॉलींगची विस्‍तृत माहिती पाहता येणार आहे.

‘मायभूमी’च्‍या टुलबारमध्‍ये दिलेली ही सुविधा वाचकांमध्‍ये अल्‍पावधीच लोकप्रिय झाली असून त्‍यासाठी वारंवार कुठल्‍याही लाईव्‍ह स्‍कोरकार्ड दाखवणा-या वेबसाईटवर जाण्‍याची गरज नसते. तसेच एकापेक्षा जास्‍त सामने सुरू असले तरीही त्यांचा स्‍कोरकार्ड वेगवेगळा पाहता येण्‍याची सोय यात आहे. आपल्‍या कम्‍प्‍युटरवर काम करताना किंवा आपल्‍या आवडीची वेबसाईट पाहताना एका बाजूला स्‍कोरकार्ड सुरू करून तो हवा तिथे ओढून नेता येण्‍याची सोय यात आहे.

या टुलबारमध्‍ये आयपीएल व्‍यतिरिक्त भारताकडून खेळल्‍या जाणा-या आणि भारता व्‍यतिरिक्त दुस-या देशांमध्‍ये खेळल्‍या जाणा-या सर्व सामन्‍यांचा धाव फलक लाईव्‍ह पाहण्‍याचीही सोय आहे. ही सोय फक्त एक क्लिकवर तुमच्‍या संगणकावर स्‍थापित होऊ शकते. आपोआप रिफ्रेश होणा-या या स्‍कोरकार्डला सोयीनुसार जागेवरून हलवता किंवा लहान-मोठे करता येते.

आयपीएलच्‍या आणि इतर ताज्या बातम्यांसाठी http://www.maaybhumi.com/ ला भेट द्या.

vdkarandikar काव्यसंग्रह
* स्वेदगंगा (इ.स. १९४९)
* मृद्गंध (इ.स. १९५४)
* धृपद (इ.स. १९५९)
* जातक (इ.स. १९६८)
* विरूपिका (इ.स. १९८१)
* अष्टदर्शने (इ.स. २००३) (या साहित्यकृतीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार)

ताज्या घडामोडी, बातम्या व लेख मराठीतून वाचण्‍यासाठी भेट द्या http://www.maaybhumi.com/ ला

Continue Reading »

मुंबई

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय,
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय.
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको! डोळे शीव !
नको पाहू जिणे भकास;
ऐन रात्री होतील भास;
छातीमध्ये अडेल श्‍वास.
विसर यांना दाब कढ;
माझ्या मना बन दगड !

vdkarandikar या ओळींनी मराठी मनावर दीर्घकाळ गारूड करणारे ज्‍येष्‍ठ कवी विंदा करंदीकर यांचे आज मुंबईतील भाभा रुग्णालयात निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्‍कार प्रदान करण्यात आला होता. ऋषितुल्‍य व्‍यक्तीमत्‍व लाभलेल्‍या विंदांच्‍या काव्‍य वाचनाने पुण्‍यातील आगामी साहित्‍य संमेलनाचे उदघाटन होणार होते. मात्र ही इच्‍छा आता अपूर्णच राहणार आहे.

मराठीतून ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा

Continue Reading »

delhi-daredevils मोहाली
किंग्स इलेवन पंजाबच्‍या 142 धावांचा पाठलाग करताना गौतम गंभीरच्‍या नेतृत्वाखालील दिल्‍ली डेअर डेव्‍हील्‍स संघाने पाच गडी राखून सामना जिंकला आहे. अखेरच्‍या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोचविणा-या या सामन्‍यात गंभीरने 72 धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली.

आयपीएल सामन्‍यांच्‍या लाईव्‍ह स्‍कोर अपडेटसाठी येथे क्लिक करा

पंजाबच्‍या 143 धावांचे आव्‍हान घेऊन मैदानात उतरलेल्‍या दिल्ली डेअरडेव्हील्स संघाला श्रीसंथने आपल्‍या पहिल्‍याच सामन्‍यात धडाकेबाज फलंदाज आणि दिलशान तिलकरत्‍ने यांना सलग बाद करून मोठा झटका दिला.

Continue Reading »

मुंबई

युसूफ पठाणच्या झंझावती शतकानंतरही राजस्थान रॉयल्स मुंबईवर विजय मिळवू शकला नाही. शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्‍थानचा चार धावांनी पराभव केला. तर युसूफने आयपीएलमधील पहिले शतक केले.

राजस्थान रॉयल्सच्‍या सुरूवातीच्‍या फलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. सलामीवीर स्वप्नील असनोदकर शून्‍यावर तंबूत परतला. त्यानंतर नमन ओझा (12), ग्रॅम स्मिथ (26) आणि अभिषेक झुनझुनवाला (14) हे देखिल फार टिकाव धरु शकला नाही. यामुळे राजस्थान संघाची अवस्था चार बाद 66 झाली.

आयपीएल सामन्‍यांचा लाईव्‍ह स्‍कोर पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा

त्‍यानंतर आलेल्‍या युसूफ पठाण आणि पारस डोग्रा यांनी सुरवातीला सावध फलंदाजी केली. मात्र नंतर युसूफने आपले खरे स्‍वरूप दाखविले. त्याने चौकार आणि षटकारांची आ‍तषबाजी करीत आपले अर्धशतक केले. युसूफचा झंझावात सुरुच असल्याने सामान मुंबई इंडियन्सच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली. युसूफने 37 चेंडूत शतकी खेळी करीत आयपीएलमधील पहिले शतक केले. शंभर धावा केल्यावर तो दुर्देवीरित्या बाद झाला. त्यानंतर पारस डोग्राने फटकेबाजी करीत विजयाच्या जवळ संघाला नेले. परंतु 41 धावांवर तो बाद झाला.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्‍स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्‍पर्धी राजस्‍थान रॉयल्‍स संघासमोर विजयासाठी 213 धावांचे अवघड आव्‍हान ठेवले आहे. सलामी फलंदाज जयसूर्याने मेस्करेनहासच्‍या पहिल्‍याच षटकात तीन चौकार ठोकले. मात्र माजी आयसीएल खेळाडू अमित उनियालच्‍या धीम्‍या चेंडूवर तो पायचीत झाला. त्‍यानंतर आलेल्‍या आदित्य तारे आणि सचिन तेंदुलकर यांनी पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत चौफेर फटकेबाजी केली.

पॉवर प्‍ले संपल्‍यानंतर राजस्‍थान संघाच्‍या शेन वॉर्नने मध्यम गती गोलंदाज दमित्रि मस्करेनहासच्‍या हाती चेंडू दिला आणि त्याने कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवत एकाच षटकात सचिन आणि तारे दोघांनाही बाद केले. दोघांनंतर मैदानावर आलेल्‍या सौरव तिवारी आणि अंबाती रायडू यांनी मात्र त्‍यानंतर जोरदार फलंदाजी करत राजस्‍थानसमोर 20 षटकात 6 बाद 212 धावा केल्‍या आहेत.

यापूर्वी दोन्‍ही संघामध्‍ये आयपीएलमध्‍ये चार सामने झाले असून त्‍यातील दोन सामने 2 राजस्थानने व 1 मुंबईने जिंकला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे.

balasaheb thackrey pR155 मुंबई
2009 मध्ये मुंबईतील कॉंटिनेंटल हॉटेलमध्ये मोडतोड केल्या प्रकरणी आता शिवसेनेला सात लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार असून, न्यायालयाने राजकीय पक्षांना वेसण घालण्यासाठी दिलेले आदेश सेनेने मान्य केल्याचे बोलले जात आहे.

Continue Reading »

Hafiz_Saeed इस्लामाबाद
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हफिझ सईद याला भारताने नव्याने दिलेल्या पुराव्‍यांच्या आधारे अटक करण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख असलेल्या सईदविरोधात भारताने दिलेले पुरावे ‘कारवाई योग्य’ नसल्याचे पाकिस्तानचे म्हटणे आहे.

उभय देशांत २५ फेब्रुवारीला झालेल्या सचिवस्तरीय चर्चेत भारताने पाकिस्तानला मुंबईतील 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यातील सहभागी पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात पुरावा म्हणून तीन कागदपत्राचे संच दिले होते.

Continue Reading »

sahityaparishad_logo पुणे

पुण्यात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्लॅमर मिळवून देण्‍यासाठी दिग्गजांना बोलावण्‍यासाठी संयोजकांचे जोरदार प्रयत्न सुरू असून  बिग बी अमिताभ बच्चन व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. दोघेही दिग्गज कविपुत्र असल्‍याने त्यांना संमेलनाचे निमंत्रण पाठवले जाण्‍याचे संकेत आयोजकांनी दिले आहेत.

अमिताभ बच्‍चन यांचे पिता हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील प्रतिष्‍ठीत कवी असून त्यांच्या ‘मधुशाला’चे मराठी रसिकही दिवाणे आहेत. तर सचिनचे वडीलही कवी होते. त्‍यामुळे पुण्‍यातील संमेलनात दोन्ही दिग्गजांची जुगलबंदी पहायला मिळावी अशी आयोजकांची इच्‍छा आहे. त्‍यासाठी संयोजन समितीमधील काही सदस्य बच्चन यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला रवाना झाले असून त्‍यांना होकार मिळण्‍याची शक्यता आहे.

सचिन तेंडुलकर मात्र गेल्‍या काही दिवसांपासून सतत क्रिकेटमध्‍ये व्यस्त असल्‍याने अद्याप आयोजकांना भेटू शकलेला नाही. त्‍यालाही लवकरच भेटून निमंत्रण दिले जाण्‍याचे संकेत मिळाले आहेत.

moon वॉशिंग्टन

भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या चांद्रयान-१ ने चंद्राच्या उत्तर ध्रुवावर बर्फाचे मोठे साठे शोधून काढल्याचे नासाने जाहीर केले आहे. चांद्रयानावर बसविलेल्या नासाच्या ‘मिनी- एसएआर’ या रडारने ही नोंद केली आहे. चंद्रावरील या परिसरात बर्फाने भरलेले ४० हून अधिक विवरे आढळली असून त्यात सुमारे ६०० दशलक्ष टन बर्फ असल्‍याची माहिती समोर आली आहे.

या नव्‍या संशोधनामुळे भारताची शान आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाढणार असून या महत्‍वाच्‍या संशोधना मागे चांद्रयानचे यश असल्‍याचे समजले जाते. पाण्याचा बर्फ असलेले ही विवरे २ ते १५ कि.मी. व्यासाची असून या शोधामुळे चंद्रावरील संशोधनाला अधिक गती मिळेल, असे नासाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाण्याची निर्मिती, वाहणे व साठा या प्रक्रिया चंद्रावर आजही सुरू असल्याचे चांद्रयानावरील विविध उपकरणांच्या सहाय्याने मिळविलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्‍याचा दावा शास्‍त्रज्ञांनी केला आहे. चांद्रयान-१ वर बसविलेल्या मिनी-सार या रडारला चंद्राच्या कायम अंधारात असलेल्या ध्रुवावरील भूपृष्ठाचे संशोधन करण्याचे काम देण्यात आले होते. चंद्राचा हा भाग पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. या रडारने चंद्राच्या ध्रुवीय भागातील रेडीओ लहरीवरून तेथील भूपृष्ठाचा अभ्यास केला आहे.