Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘shiv sena’ Category

balasaheb thackrey pR155 मुंबई
2009 मध्ये मुंबईतील कॉंटिनेंटल हॉटेलमध्ये मोडतोड केल्या प्रकरणी आता शिवसेनेला सात लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार असून, न्यायालयाने राजकीय पक्षांना वेसण घालण्यासाठी दिलेले आदेश सेनेने मान्य केल्याचे बोलले जात आहे.

(अधिक…)

Read Full Post »

मुंबई

जर देशप्रेम बाळगणे आणि देशप्रेमाची गोष्‍ट करणे सर्वांनाच बेईमानी वाटत असेल तर शिवसैनिकांनी तरी या भानगडीत का पडावे. येऊ द्या ऑस्‍ट्रेलियनांना आणि खेळू द्या क्रिकेट, असे उद्वीग्नपणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

या संदर्भात शिवसेना प्रमुखांनी काढलेल्‍या एका पत्रकात म्हटले आहे, की शिवसेनेचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विरोध का आहे. हे कधी कुणी समजून घेण्‍याचा प्रयत्नच केला नाही. ऑस्‍ट्रेलियात भारतीयांवर रोजच हल्‍ले होत आहेत. तिथले सरकार ही बाब गांभीर्याने घ्‍यायला तयार नाही, अशा स्थितीत जर आम्ही देशाची अस्मिता आणि देशप्रेम म्हणून त्यांना विरोध केला. तर सर्वच आमच्‍यावर टीका करतात. त्यांच्‍या दृष्‍टीने आम्ही गुन्‍हेगार ठरतो. जर देशप्रेम बाळगून आम्ही बेईमान ठरत असू तर मग विरोध का करायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी बाळासाहेबांनी इंडियन प्रीमियर लीगमध्‍ये (आयपीएल) ऑस्ट्रेलियन खेळाडूंना खेळू देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. त्‍यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना आंदोलन न करण्‍यासाठी गळ घातली होती. मात्र बाळासाहेबांनी सोमवारी एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपला विरोध कायम असल्‍याचे जाहीर केले होते. आत अचानक त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

Read Full Post »

मुंबई

ऑस्ट्रेलियात भारतीयांना होत असलेल्‍या मारहाणीनंतरही जर आपण त्‍यांच्‍याशी क्रिकेट खेळू लागलो तर हा आपला दुबळेपणाच म्‍हणावा लागेल. असे सांगतानाच कांगारूंना आयपीएलमध्‍ये भारतात खेळू न देण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्‍याचा पुनरूच्‍चार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. मी थकलो असलो तरीही अद्याप रिटायर झालो नसल्‍याचेही त्यांनी स्‍पष्‍ट केले.

click hereरंगशारदा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख म्हणाले, की ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला ला आमचा विरोध नव्हता तर शाहरूखच्या पाक प्रेमाला विरोध असल्‍यानेच शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. ऑस्‍ट्रेलियात भारतीयांवर अन्‍याय होत असताना आपण त्यांना भारतात बोलावून त्यांच्‍याशी क्रिकेट खेळणार असू तर आपल्‍या सारखे करंटे आणि बुळचट कोण असा सवाल करतानाच कांगारूंना मुंबईत आयपीएल खेळू देणार नाही या आपल्‍या भूमिकेवर आपण ठाम असल्‍याचे त्यांनी स्‍पष्‍ट केले.

काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणी बाळासाहेबांची भेट घेतल्‍यानंतरही शिवसेनेने भूमिका न बदलल्‍याने राज्‍य सरकारसमोर पुन्‍हा नवीन प्रश्‍न उपस्थित उभे राहण्‍याची शक्यता आहे.

<ilayer src=”http://www.s2d6.com/x/?x=i&z=i&v=2551526&r=%5BRANDOM%5D&k=%5BNETWORKID%5D” z-index=”0″ width=”468″ height=”60″>

</ilayer>

Read Full Post »

मुंबई
बॉलीवुड जगभरात भारताचे प्रतिनिधीत्व करत असते. त्‍या भारताचा प्रतिनिधी म्हणून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळ व्‍हावी यासाठी मी आयपीएल संदर्भात मत व्‍यक्त केलं, मी जे बोलतो ते पूर्णपणे विचार करूनच त्‍यामुळे माझ्या या वक्तव्‍यामागे कुठलाही गैर उद्देश नव्‍हता मात्र कळत-नकळत कुणाचं मन दुखावलं गेलं असल्‍यास मी दिलगिर आहे, अशा शब्‍दात किंग खान शाहरूखने आज शिवसेना प्रमुखांच्‍या नावाचा उल्‍लेख न करता त्यांची ट्विटरवरून माफी मागितली आहे.

अनेक वादांचा सामना केल्‍यानंतर आणि शिवसैनिकांचे आंदोलन मोडून काढत मुंबईत अखेर ‘माय नेम इज खान’  प्रदर्शित झाला असून त्‍यास प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्‍याबद्दल शाहरूखने ट्विटर या सोशल नेटवर्कींग वेबसाईटवर म्हटले आहे, की मला लहानपणापासून माझ्या शिक्षकांनी कमी आणि योग्य बोलायची शिकवण दिली. माझी पत्‍नीही मला आज तेच सांगत असते. त्यामुळे मी जेव्‍हा काहीही बोलतो ते अगदी विचार करूनच. बॉलीवुड जगभरात भारताचे प्रतिनिधीत्व करणारी मोठी संस्‍था आहे. त्‍या भारताचा प्रतिनिधी म्हणून आंतरराष्‍ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा उजळ व्‍हावी आणि भारत-पाकमधील दरी सांधली जावी या उद्देशाने मी आयपीएल संदर्भात मत व्‍यक्त केलं, माझे हे मत पूर्णतः वैयक्तीक असून या वक्तव्‍यामागे कुठलाही गैर उद्देश नव्‍हता मात्र कळत-नकळत कुणाचं मन दुखावलं गेलं असल्‍यास मी दिलगिर आहे, असे शाहरूखने म्हटले आहे.

आयपीएलमध्‍ये पाकिस्‍तानी खेळाडूंचा समावेश न करणे हा त्यांचा अपमान होता, असे मत शाहरूख खानने व्‍यक्त केल्‍यामुळे गेल्‍या 15 दिवसांपासून त्‍याच्‍या विरोधात शिवसेनेने जोरदार आंदोलन उभारले असून शाहरूखच्‍या ‘माय नेम इज खान’ला मुंबईत प्रदर्शित होऊ न देण्‍याची भूमिका सेनेने घेतली आहे. याबाबत शाहरूखने दुःख व्‍यक्‍त केले असून मुंबई आपली सर्वांची असून तिची प्रतिष्‍ठा जपली पाहिजे असे आवाहनही त्याने केले.

शाहरुखने ट्विटरच्‍या मदतीने शिवसेनेकडे मैत्रिचा हात पुढे केला असून त्याला ठाकरेंकडून कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता लक्ष लागले आहे.

sa_client = “9cb91b21f6b8d0a8b716443c7f9acadd”;sa_code = “e56b0128ff5b32fb0e938901cc08b290”;sa_pline = “0”;sa_maxads = “2”;sa_bgcolor = “ffffff”;sa_bordercolor = “aaaaff”;sa_superbordercolor = “aaaaff”;sa_linkcolor = “0000a0”;sa_desccolor = “000000”;sa_urlcolor = “008000”;sa_b = “0”;sa_ap = “50”;sa_format = “banner_468x60”;sa_width = “468”;sa_height = “60”;sa_location = “0”;sa_radius = “0”;sa_borderwidth = “1”;sa_font = “0”;

Read Full Post »

मुंबई

राज्य सरकारकडून मल्‍टीप्‍लेक्स चालकांना सुरक्षेची खात्री देण्‍यात आल्‍यानंतर अखेर मल्‍टीप्‍लेक्स चित्रपट गृहमालकांच्‍या संघटनेने एक शो उशीराने म्हणजे दुपारी 12 वाजेला चित्रपट रिलीज करण्‍याचा निर्णय घेतला आहे. गेल्‍या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्‍या प्रदर्शना संदर्भात वाद होते. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत राज्‍यभरातील सुमारे 2400 शिवसैनिकांना अटक केली आहे.

आयपीएलमध्‍ये पाक खेळाडूंच्‍या बाजूने मत प्रदर्शित केल्‍यावरून निर्माण झालेला वाद शाहरूख खानच्‍या ‘माय नेम इज खान’वर अडकला असून या चित्रपटाचे प्रदर्शन कुठल्‍याही स्थितीत होऊ न देण्‍याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. चित्रपटाला शिवसैनिकांचा होणारा विरोध आणि सुरक्षेच्‍या कारणांमुळे तो प्रदर्शित करावा किंवा नाही या संदर्भात मल्‍टीप्‍लेक्स ओनर्स असोसिएशनच्‍या मालकांच्‍या बैठकीनंतर तो मुंबईतील फन रिपब्लिकनसह काही मल्‍टीप्‍लेक्समध्‍ये प्रदर्शित करण्‍याचा निर्णय झाला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने चित्रपट प्रदर्शित करण्‍यासाठी सर्वेस्‍व पणाला लावून तयारी केली असून मुंबईत
चित्रपटगृहांच्‍या सुरक्षेसाठी सुमारे 11 हजार पोलिसांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत. तर पोलिसांच्‍या
साप्‍ताहिक सुट्याही रद्द करण्‍यात आल्‍या आहेत. या शिवाय राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपी) 600 जवान थिएटरच्‍या बाहेर आणि आत तैनात करण्‍यात आले आहेत. तर सुमारे 2400 शिवसैनिकांना अटक करण्‍यात आली असून अटक सत्र सुरू करण्‍यात आले आहे.

मुंबई व्‍यतिरिक्त राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्‍येही या चित्रपटाच्‍या प्रदर्शनास विरोध होत असला तरीही काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपायानंतर तो प्रदर्शित करण्‍यात आला आहे. नागपूर शहरातील सिनेमॅक्स थिएटर वगळता इतर ठिकाणी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

चित्रपटाला विरोधाचा वणवा राज्‍याबाहेरही पेटला असून मध्‍यप्रदेशातील इंदूर शहरात चित्रपट प्रदर्शनाला विरोध करताना शिवसेनेच्‍या सुमारे 45 कार्यकर्त्‍यांनी पोस्‍टर्स जाळून थिएटरमध्‍ये तोडफोड केली या घटनेनंतर पोलिसांनी लगेच सक्रीय होत त्‍यांना अटक केली आहे. तर गुजरातमध्‍ये या वादात विहिंप व बजरंग दलाने एन्‍ट्री घेतली असून कार्यकर्त्यांच्‍या निदर्शनामुळे अहमदाबाद शहरात चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्‍यात आले आहे.

<ilayer src=”http://www.s2d6.com/x/?x=i&z=i&v=2551526&r=%5BRANDOM%5D&k=%5BNETWORKID%5D” z-index=”0″ width=”468″ height=”60″>

</ilayer>

<ilayer src=”http://www.s2d6.com/x/?x=i&z=i&v=2551526&r=%5BRANDOM%5D&k=%5BNETWORKID%5D” z-index=”0″ width=”468″ height=”60″>

</ilayer>

Read Full Post »

मुंबई

आयपीएलमध्‍ये पाकिस्‍तानी खेळाडूंना सहभागी करून घेण्‍यासंदर्भात शाहरुख खानने केलेल्‍या वक्तव्‍यानंतर शिवसैनिकांचा मुंबईतील ‘राडा’ कमी होण्‍याची चिन्‍हे दिसत नसून शिवसैनिकांनी राडा न थांबवल्यास सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे संरक्षण काढून घेण्याच्‍या मुख्‍यमंत्र्यांच्‍या धमकीनंतर उद्धव यांनी आपले संरक्षण सरकारला परत केले आहे.

यापूर्वी सरकारने सेनेच्‍या चार आमदारांचे संरक्षण काढून घेतले असून आता उध्‍दव यांनीही संरक्षण परत केल्‍याने सेनेच्‍या सर्व आमदारांनी आपले संरक्षण परत केले आहे.

कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या मुंबई दौ-यात सेनेने त्यांना आव्हान दिल्याने नाराज कॉग्रेस सरकारने उद्धव यांचे संरक्षण काढून घेण्याची धमकी दिली होती. त्‍यास प्रत्युत्तर म्हणूनही उद्धव यांच्‍या या कृतीकडे पाहिले जात आहे.

सुरक्षा-व्यवस्था परतवल्‍यानंतर उद्धव यांनी सरकारच्‍या कुठल्‍याही धमकीला आपण घाबरत नसल्‍याचे सांगत 40 वर्षांपासून शिवसेना रस्‍त्यावर काम करते आहे. त्यामुळे आपल्‍याला सुरक्षेची गरज नसल्‍याचे सांगितले आहे.

शाहरुखच्‍या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाला मुंबईत प्रदर्शित न करण्‍याचा इशारा सेनेने थिएटर चालकांना
दिला असून तो प्रदर्शित व्‍हावा यासाठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक करण जौहर यांनी मंगळवारी मुंबई पोलीस कमिशनर डी. शिवानंद आणि संयुक्त पोलीस आयुक्त हिमांशु रॉय यांची भेट घेऊन संरक्षणाची मागणी केल्‍यानंतर प्रदर्शनाला विरोध करण्‍यासाठी शिवसेनेचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

दरम्‍यान, शिवसैनिकांनी घाटकोपर, मुलुंड आणि कांजुरमार्गमधील चित्रपटगृहांमध्‍ये जोरदार तोडफोड केली. या घटनेनंतर या चित्रपटाचे एडव्‍हांस बुकिंग बंद करण्‍यात आले आहे. तर या प्रकरणी 400 शिवसैनिकांना अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांना शुक्रवारी सोडण्‍यात येणार आहे.

दरम्‍यान, या प्रकरणानंतर शाहरूख अबुधाबीला रवाना झाला असून आपण परत येऊन बाळासाहेबांची भेट घेणार असल्‍याचे त्‍याने जाहीर केले आहे.

हे देखिल वाचाः

‘माय नेम इज खान’ची समीक्षा

‘खान’च्‍या मुंबई रिलीजवरून पुन्‍हा ‘रण’

माय नेम इज खान

शाहरुख खानचा आता मनसेला ‘चिमटा’

संघाने आम्हाला अस्मिता शिकवू नयेः उध्‍दव

<ilayer src=”http://www.s2d6.com/x/?x=i&z=i&v=2551526&r=%5BRANDOM%5D&k=%5BNETWORKID%5D” z-index=”0″ width=”468″ height=”60″>

</ilayer>

Read Full Post »

click hereमुंबई

करण जोहर आणि शाहरूख खानच्‍या ‘माय नेम इज खान’ला मुंबईत कुठल्‍याही स्थितीत प्रसारित होऊ देणार नसल्‍याचे जाहीर करत शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी खान विरोधात गुंडाळलेले आंदोलन पुन्‍हा सुरू केले आहे.

चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने या चित्रपटाला संरक्षण देण्‍याच्‍या मागणीसाठी आज थिएटर मालकांसह मुंबईचे पोलीस कमिशनर डी. शिवनंद यांची भेट घेतली. त्‍यानंतर शिवसेनेने हे आंदोलन सुरू केले आहे.

यापूर्वी शिवसेनेने आपण चित्रपटाला विरोध करणार नसल्‍याचे जाहीर केले होते. मात्र तरीही जोहर पोलिसांना जाऊन भेटल्‍याने हा विषय पुन्‍हा पेटला आहे.

दरम्‍यान, चीडलेल्‍या शिवसैनिकांनी भांडूपमधील दोन चित्रपटगृहांमध्‍ये तोडफोड केली असून त्यानंतर आंदोलन तीव्र झाले आहे.

<ilayer src=”http://www.s2d6.com/x/?x=i&z=i&v=2551526&r=%5BRANDOM%5D&k=%5BNETWORKID%5D” z-index=”0″ width=”468″ height=”60″>

</ilayer>

Read Full Post »

Karuna-1-pib
आयुष्‍यभर हिंदीच्‍या नावाने बोटं मोडणा-या आणि हिंदी विरोधी वातावरण तापवत ठेवून त्‍यावर आपली राजकीय पोळी भजून घेणा-या तमीळनाडूचे मुख्‍यमंत्री एम. करुणानिधी यांना आता उतारवयात हिंदीबद्दल प्रेम दाटून आले असून त्यांनी आपल्‍या राज्यात हिंदीचा प्रचार करण्‍यास आपला कधीही विरोध नव्‍हता असे स्‍पष्‍ट केले आहे.

महाराष्ट्रात मराठी व अमराठी मुद्यावरून सुरू असलेला वाद आता दक्षिण भारतातही पोचला असून करुणानिधी यांनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका करताना म्हटले आहे, की शिवसेना मराठी माणसाच्‍या हिताचा दावा करत असली तरीही त्‍यांच्‍या भूमिकेला राज्‍यात जनाधार नाही. देशात कुठलाही पक्ष इतक्या संकुचित विचारसरणीत राहू शकत नाही. दक्षिण भारतीय कधीही हिंदी विरोधी नव्‍हते आणि राज्यात हिंदीचा प्रचार करण्‍यास आपल्‍याला हरकत नसल्‍याचेही त्यांनी म्हटले आहे.

करुणानिधी एकेकाळी हिंदीला विरोध करणारे सर्वांत मोठे नेते म्हणून ओळखले जात होते. त्‍यांच्‍या पक्ष व्‍यतिरिक्त दक्षिण भारतातील सर्वच पक्षांच्‍या राजकारणात हिंदी विरोध हा मोठा मुद्दा होता. मात्र आता ते हिंदीला पाठिंब्याच्‍या गोष्‍टी करू लागले आहेत.

Read Full Post »

मुंबईashok chavan

मराठी लोकांसंदर्भात सातत्याने बोटचेपी भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री अशोक चव्हाण आता आपल्या सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच लक्ष्य ठरले आहेत. टॅक्सी चालकांना परमिट देण्याचा मुद्दा असो वा मुंबई कुणाची या वादात राहूल गांधीची केलेली पाठराखण या सगळ्यातून मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मराठी लोकांची भूमिका मांडलीच नाही, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

नाशिकमध्ये कालच झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई कुणाची या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व सुनील तटकरे यांनी मुंबई सर्वांत आधी मराठी माणसाचीच असल्याचे सांगून यात वाद उत्पन्न होण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटले होते. पण त्यांचे नेते मात्र मराठी माणसांसंदर्भात मात्र सातत्याने बोटचेपी भूमिका घेत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही जनतेत तोंड दाखविण्यास जागा उरत नसल्याचे चित्र आहे.

टॅक्सी चालकांना परमिट देण्यासाठी मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणे सक्तीचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले. परंतु, त्यावर परप्रांतियांकडून जोरदार टीका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यू टर्न घेऊन स्थानिक भाषा येणे गरजेचे असल्याचे सांगून ही भाषा हिंदी, गुजराती किंवा मराठी असू शकते, असे स्पष्ट केले. यातून परप्रांतियांनासुद्धा परवाने मिळू शकतील हेच दाखवून दिले.

त्यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतियांचे संरक्षण करण्यास आमचे महाराष्ट्रातील सरकार सक्षम असल्याचे तिकडे बिहारमध्ये राहूल गांधींनी सांगताच इकडे मुख्यमंत्र्यांनी लगोलग पत्रक काढून ‘परप्रांतियांचे संरक्षण करण्यास सरकार सक्षम’ असल्याचे सांगितले. पण त्यावर टीका होणार हे लक्षात येताच पत्रक मागे घेऊन परप्रांतियांसह सर्व जनतेचे संरक्षण करू असा बदल करण्यात आला.

या सगळ्यांतून आपल्याच लोकांविषयी मुख्यमंत्र्यांची भूमिका हिताची नसल्याचा संदेश जातो आहे, असे सांगून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

<ilayer src=”http://www.s2d6.com/x/?x=i&z=i&v=2551526&r=%5BRANDOM%5D&k=%5BNETWORKID%5D” z-index=”0″ width=”468″ height=”60″>

</ilayer>

Read Full Post »

मुंबई

शाहरूख खानने शिवसेना प्रमुखांची माफी मागणार नाही, अशी उर्मटपणाचे वक्‍तव्‍य न्‍यूयॉर्कमध्‍ये करण्‍यापूर्वी हे विसरू  नये की मन्‍नत मुंबईत आहे पाकिस्‍तानात नाही. त्‍याने हिंमत असेल तर हेच वाक्य पुन्‍हा मुंबईत बोलून दाखवावे, अशी तंबी खा.संजय राऊत यांनी दिली आहे.

दरम्‍यान, शाहरूखच्‍या चित्रपटांना कुठल्‍याही परिस्थितीत मुंबईत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा सेनेने पुन्‍हा दिल्‍याने मुंबईतील चित्रपटगृह चालकांनी ‘माय नेम इज खान’चे पोस्‍टर्स थिएटरवरून उतरवले आहेत.  यामुळे मुंबईत चित्रपट प्रदर्शनाचे मार्ग बंद होण्‍याची चिन्‍हे निर्माण झाली आहेत.

Read Full Post »

Older Posts »