Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘international’ Category

moon वॉशिंग्टन

भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या चांद्रयान-१ ने चंद्राच्या उत्तर ध्रुवावर बर्फाचे मोठे साठे शोधून काढल्याचे नासाने जाहीर केले आहे. चांद्रयानावर बसविलेल्या नासाच्या ‘मिनी- एसएआर’ या रडारने ही नोंद केली आहे. चंद्रावरील या परिसरात बर्फाने भरलेले ४० हून अधिक विवरे आढळली असून त्यात सुमारे ६०० दशलक्ष टन बर्फ असल्‍याची माहिती समोर आली आहे.

या नव्‍या संशोधनामुळे भारताची शान आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर वाढणार असून या महत्‍वाच्‍या संशोधना मागे चांद्रयानचे यश असल्‍याचे समजले जाते. पाण्याचा बर्फ असलेले ही विवरे २ ते १५ कि.मी. व्यासाची असून या शोधामुळे चंद्रावरील संशोधनाला अधिक गती मिळेल, असे नासाने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पाण्याची निर्मिती, वाहणे व साठा या प्रक्रिया चंद्रावर आजही सुरू असल्याचे चांद्रयानावरील विविध उपकरणांच्या सहाय्याने मिळविलेल्या माहितीवरून स्पष्ट होत असल्‍याचा दावा शास्‍त्रज्ञांनी केला आहे. चांद्रयान-१ वर बसविलेल्या मिनी-सार या रडारला चंद्राच्या कायम अंधारात असलेल्या ध्रुवावरील भूपृष्ठाचे संशोधन करण्याचे काम देण्यात आले होते. चंद्राचा हा भाग पृथ्वीवरून कधीही दिसत नाही. या रडारने चंद्राच्या ध्रुवीय भागातील रेडीओ लहरीवरून तेथील भूपृष्ठाचा अभ्यास केला आहे.

Read Full Post »

ढाका
बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीब उर रहमान यांच्या हत्येप्रकरणी बांगलादेश सैन्याच्या पाच माजी सैन्य अधिकाऱ्यांना बुधवारी मध्यरात्री फाशी देण्यात आली. 1975 मध्ये या अधिकाऱ्यांनी शेख मुजीब उर रहमान यांच्या कुटुंबातील अनेकांची हत्या केली होती. तसेच बांगलादेशी सरकार उलथले होते. बुधवारी मध्यरात्री या साऱ्यांना फाशी देण्यात आली.

ढाक्यातील सर्वोच्च न्यायालयाने या पाच अधिकाऱ्यांची क्षमा याचिका रद्द केल्यानंतर देशातील 66 इतर तुरुंगातील सुरक्षा वाढवण्यात आली होती. न्यायालयाने या पाच अधिकाऱ्यांची फाशी कायम ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर या अधिकाऱ्यांना बुधवारी फाशी देण्यात आली.

Read Full Post »

mukesh ambani लंडन
मुंबईत टॅक्सी परवान्यासाठी मराठी बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय दुर्देवी असल्याचे सांगून ‘मुंबई ही सर्वांचीच आहे,’ असे मत रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले आहे.

राज्यसभेतील खासदार एन. के. सिंग यांच्या ‘नॉट बाय रिझन अलोन- द पॉलिटिक्स ऑफ चेंज’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. आपण सर्व सर्वांत आधी भारतीय आहोत. मुंबई, चेन्नई, दिल्ली सर्व भारतीयांची आहे. हेच वास्तव आहे, असे सांगून ते म्हणाले, आर्थिक उदारीकरणानंतर भारतातील कॉर्पोरेट जगत परवाना राज संस्कृतीपासून दूर गेले, पण मुंबईतील गरीब टॅक्सीवाला मात्र परवाना राज संस्कृतीतच अडकला आहे. अंबानींच्या या वाक्यानंतर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, की भारतापुढे सर्वांत मोठे आव्हान हे आहे की आपण प्रत्येक वर्षी १५ ते वीस दशलक्ष नव्या नोकर्‍या कशा निर्माण करणार? त्यामुळे येत्या काही वर्षांत रोजगार उपलब्ध करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

Read Full Post »